देश

मोरबाग येथील संत गाडगे बाबा रुग्णालय केले बंद ; डॉ .विशाल काळे आरोग्य अधिकारी यांची धडक कारवाई.

अमरावती, देवेंद्र भोंडे : अमरावती शहरात इंडीयन मेडिकल असोसिशन, व विविध संघटना ,पक्ष व इतर सर्वसामान्य जनतेच्या तक्रार नुसार बोगस डॉक्टर, मुंबई नर्सिंग होम कायद्यानुसार रुग्णालयाचे नोंदणी न करता रुग्णालय चालवणे व बायोमेडिकल वेस्ट ची परवानगी न घेता तसेच रुग्णालयाच्या प्रतीक्षा कक्षात उपचार करणारे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्याचे वैद्यकीय शैक्षणिक कागदपत्रे ,प्रमाणपत्र ,पदवी , नोंदणी प्रमाणपत्र सर्व रुग्णालयाला लावणे बंधन कारक आहे.

    परंतु संत गाडगे बाबा या रुग्णालयात बाल रोग तज्ञ , नेत्र रोग तज्ञ , मेडिसिन तज्ञ स्त्री प्रसूती तज्ञ व इतर रोग तज्ञ यांच्या वतीने दवाखाना व रुग्णालय सुरू होता. दि. 8/10/24 रोजी दवाखान्यात भेट दिली असता व आज 10/10/24 रोजी संद्या 5 वाजता कार्यवाही करत असताना कोणतेही डॉक्टर व संत गाडगे बाबा चे संचालक उपस्थित नव्हते. ज्यांनी ही जागा भाड्याने दिलीं होती तेच मालक उपस्थित होते व रिसेप्शन वर मुलगी व एक कर्मचारी उपस्थित होता आणि अतूल गौतम हा पॅरामेडिकल ओप्थलमेट्री कोर्स केलेला रुग्णांस रू.150/- घेऊन तपासून डोळ्याचे चष्मा नंबर व आय ड्रॉप लिहून दिला होता .डॉ विशाल काळे आरोग्य अधिकारी ,सार्वजनिक आरोग्य विभाग महानगर पालिका अमरावती , मसांनगंज येथील वैद्यकीय अधिकारी डॉ . अल्मास खान ,मुख्यालयातील डॉ .रुपेश खडसे तपासणी अधिकारी व सिटी कोतवाली मधील पोलिस कर्मचारी यांच्या संयुक्त मध्यस्थीने ह्या संत गाडगे बाबा रुग्णालयाला दोन दिवस अगोदर येथील कार्यकारी डॉक्टरांचे शैक्षणिक कागदपत्रे ,तसेच रुग्णालय चालवण्यासाठी लागणारे महानगर पालिकेच्या वतीने मिळणारे परवानगी प्रमाण पत्र मागून सुद्धा सदर संस्थेने सादर केले नसल्याने ही कार्यवाही करण्यात आली सदर कार्यवाही दरम्यान तेथील महत्वपूर्ण कागदपत्रे ,नोंद वही, व ज्या डॉक्टर यांनी तपासणी केली नाही तेथील पॅरामेडिकल कोर्स केलेल्या कर्मचाऱ्यांनी तपासून औषध व डोळ्याचा चष्म्याचा नंबर दिला ह्याची सुद्धा चौकशी सुरू करण्यात आली आहे , ह्या अनिधिकृत रुग्णालय , बोगस डॉक्टर , स्वतःची डिग्री बदलवून उच्च पदवी दाखवून जनतेला तज्ञ दाखवणाऱ्या सर्व डॉक्टरांचे तपासणी अभियान सुरू करण्यात आले आहे.

   सदर ह्या विशेष मोहीम मध्ये मनपा चे आरोग्य अधिकारी डॉ विशाल काळे , मुख्यालयातील डॉ रुपेश खडसे , शहरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी , व इतर सामूहिक पद्धतीने राबविण्यात येत आहे ह्या रुग्णालयातील सर्व डॉक्टरांचे कागदपत्रे 24 तासात उपलब्ध करण्यास सर्वांना सूचित केले असून दवाखाण्याला नोटीस लाऊन बंद करण्याचे आदेश संबंधित घर मालक, व तेथील कर्मचारी व संचालक संत गाडगे बाबा रुग्णालय यांना लेखी पत्र देऊन कळविले आहे जर सार्वजनिक आरोग्य विभाग आरोग्य अधिकारी यांच्या पूर्व परवानगीने दवाखाना सुरू केल्यास गंभीर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे आरोग्य अधिकारी यांनी स्पष्ट आदेश देण्यात आले तसेच अमरावती शहरात कुठेही वैद्यकीय अहर्ता प्राप्त नसताना लोकांवर उपचार करत असेल तर अश्या भोंदू व बोगस व अनिधीकृत डॉक्टरांची तक्रार असल्यास सार्वजनिक आरोग्य विभाग महानगर पालिका येथे कोणतीही भीती न बाळगता देण्यात यावी असे आव्हान जनतेला करण्यात येत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}