धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सामूहिकबुद्ध वंदना घेऊन महामानवास अभिवादन.
शंकर बरडे/दुधड-वाळकेवाडी! ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने १२ ऑक्टोबर रोजी दुधड-नवीआबादी येथे बौद्ध अनुयायांच्या वतीने सामूहिक बुद्धवंदना घेऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय हर्षउल्हासात धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम बुद्ध विहार परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरात संपन्न झाला.सामूहिक बुद्ध वंदना चा कार्यक्रम सकाळी १०:०० वाजता घेण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर हिमायत्तनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी धर्मीय बांधव यांच्या वतीने मानवंदना देण्यात आली.व उपस्थित जनसमुदायास त्रिशरण पंचशील ग्रहण केले यावेळी, प्रमुख उपस्थिती पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्यासह वाळकेवाडी येथील शासकीय आश्रम शाळेचे शिक्षक तुकाराम आडबलवार , पोलिस पाटील गजानन शिंदे, वाळकेवाडीचे पोलिस पाटील परमेश्वर बुरकुले,तंटामुक्त अध्यक्ष बालाजी भुरके, जेष्ठ नागरिक मा. सरपंच नारायण वाळके, तानाजी वाळके, सुरेश डवरे, बिट जमादार बालाजी पाटील, तसेच सर्व धर्मीय बांधव उपस्थित होते.सिद्धार्थ नवयुवक मंडळाने व येथील सर्व ज्येष्ठ मंडळींनी सर्व मान्यवरांचे स्वागत आणि आभार व्यक्त केले.आणि पुढील नियमित तथागत भगवान गौतम बुध्द आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक जयंतीला सुरुवात झाली..