दिघी येथील रहिवाशांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळवण्यासाठी थेट मंत्रालयाकडे मागणी.
राजु गायकवाड यांनी केली मागणी.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे दिघी या गावातील नागरिकांना अशुद्ध नदीचे पाणी पिऊन जिवन जगवा लागतं,सन 2015/16/17 वर्षी पाणी पुरवठा विभाग अंतर्गत 52 लक्ष रुपयांचा निधी मंजूर होऊन त्याचे कामं देखील करण्यात आले होते.
परंतु गुत्तेदार व संबंधित अधिकारी यांनी थातुरमातुर काम करुन दिघी येथील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवले आज घडीला नदीचे दुशीत पाणी पिण्याची वेळ संबंधित गुत्तेदार व अधिकारी यांनी या नागरिकांवर आणली आहे,सदरील पाणी पुरवठा विभागाने करण्यात आलेल्या काम सुरळीत करण्यात यावे किंवा दिघी गावाला भरघोस निधी मंजूर करुन पुन्हा एकदा टिकाऊ कामं करून सुरळीत गावातील नागरिकांना पाणी मिळुन द्यावे या मागणीसाठी दिघी येथील तरुण तडफदार युवा नेतृत्व राजु गायकवाड यांनी दिनांक 8/ऑगस्ट 2024 गुरुवार रोजी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या कार्यालय मंत्रालय मुंबई येथे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.दिघी येथील रहिवाशांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळुन देण्यासाठी पाठपुरावा करतच राहणार असल्याचे राजु गायकवाड यांनी सांगितले आहे.