मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा’ या अभियानामध्ये गुलाम नबी आझाद उर्दु हायस्कूल,पुसदचा तिसरा क्रमांक.
खाजगी गटातून पुसद तालुका स्तरावर तिसरा क्रमांक मिळाला.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागा अंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा’ या अभियाना मध्ये सत्र २०२३-२४ मध्ये राज्यातील सर्वच माध्यमाच्या शाळांचा सहभाग घेण्यात आला होता.त्यानूसार या अभियाना मध्ये गुलाम नबी आझाद उर्दु हायस्कूल पुसदने सुद्धा सहभाग घेतला होता.या अभियाना अंतर्गत अनेक वेग वेगळे उपक्रम होते.त्या उपक्रमाची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद सादिक शेख सरांनी शाळेतील शिक्षक सैय्यद सलमान सैय्यद शेरु सरांची नियुक्ती या अभियानाचे नोडल अधिकारी म्हणून करण्यात आली होती.त्या अनुषंगाने या अभियानाच्या परीपत्रकानुसार दर-रोज नियोजन पूर्वक उपक्रम राबविण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी अनेक उपक्रम होते. त्याची योग्य अशी अंमलबजावणी शाळेत करण्यात आली होती. त्यावर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या मुल्यांकन समितीने निरीक्षण करून मुल्यांकन केले होते. त्या आधारे गुणदान करण्यात आले. त्यानुसार पुसद तालुका स्तरावर खाजगी गटातून गुलाम नबी आझाद उर्दु हायस्कूल, पुसदला तिसरा क्रमांक मिळाला आहे.हा पुरस्कार सोहळा बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी कॉलेज,पुसद येथे मोठ्या थाटाने पार पडला या कार्यक्रमामध्ये मा.ज्ञानेश्वर ठाकरस साहेब( गट विकास अधिकारी),मा.सुशीला आवटे मॅडम (गट शिक्षण अधिकारी), मा.बोजेवार सर (विस्तार अधिकारी), मा.फोपसे मॅडम (विस्तार अधिकारी) तसेच केंद्र प्रमुख मोहिते सर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये क्रमांक मिळालेल्या शाळांना बक्षिस देण्यात आले. यामध्ये मा.गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर ठाकरस सरांच्या हस्ते तिसरा क्रमांक पटकावलेल्या गुलाम नबी आझाद उर्दु हायस्कूलला एक लाखाचा चेक, ट्रॉफी ,प्रमाणपत्र शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद सादिक शेख सर आणि या उपक्रमाचे शाळेतील नोडल अधिकारी सैय्यद सलमान सरांना देऊन सन्मानीत करण्यात आले. शाळेला मिळालेल्या या पुरस्काराचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.वजा़हत मिर्झा साहेब, तेसच सचिव मा.सज्जाद मिर्झा साहेब, व उपाध्यक्ष मा. के.आय मिर्झा साहेब,शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद सादिक शेख सर तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद,व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जाते.