९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त पूर्वतयारी बैठकिस उपस्थित राहावे.
नांदेडयेथील कर्मचारी बांधव,विद्यार्थी -विद्यार्थीनी
(मुख्य कार्यकारी संपादक, शंकर बरडे)
नांदेडमध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जागतिक आदिवासी दिन हे मोठया उत्साहात पार पडायचा आहे याच अनुषंगाने दि, २८ जुलै रोजी संबंध नांदेड जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी या आढावा बैठकीत उपस्थित राहून येत्या ९ आगस्टला नांदेड शहरात आपला जागतिक आदिवासी दिवस कसा मोठया संख्येत पार पडेल, याची नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक आदिवासी समाज बांधवांनी काळजी घ्यावी कारण मागील काही
वर्षांत भारतातील जनजातीय (आदिवासी) समाजाच्या भोळेपणाचा, त्यांच्या एकत्रित समूह पद्धतीने राहण्याचा, अस्मितेचा फायदा घेऊन भारतातील काही विचारधारा, संस्था, पंथ-जातीपातींमध्ये भेद उत्पन्न करणारी यंत्रणा, आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या साहाय्याने ९ ऑगस्ट हा ‘जागतिक आदिवासी गौरव दिन’ म्हणून साजरा करीत आहे. जगात ४४ कोटी आदिवासी असून त्यातील ११ कोटी आदिवासी भारतीय आहेत. आपण भारतवासी नसून मूलनिवासी, म्हणून आपण आदिवासी आहोत, उर्वरीत परके आहेत. त्यांना घालवून राजा होण्याचा हा गौरव दिन म्हणजे जागतिक आदिवासी दिवस ९ ऑगस्ट, असा गैरसमज या काही संस्था भोळ्या समाजात पेरत आहेत, या गोष्टीवर आपल्या मुलआदिवासी बांधवांनी कुठे तरी विचार करून आपल्यात होणारी घुसखोरी थांबीवने काळाची गरज आहे..
या सर्व गोष्टीचे गांभीर्याने लक्षात घेऊन आपण या देशाचे मूलनिवासी आहोत हे दाखवून देण्यासाठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रचंड मोठया संख्येत उपस्थित राहुन जागतिक आदिवासी दिन पार पाडायचा आहे.असे आवाहन नांदेडजिल्ह्यातील आदिवासी कर्मचारी बांधव , महिला विद्यार्थी व विद्यार्थीनी केले आहे
स्थळ :- डॉ. देवराव पोटे यांच्या निवासस्थानी, जनार्धन नगर, नांदेड (हनुमान गडाच्या पाठीमागे) संपर्क मो. ९८५०००४६२३मो. ९६०४४८४३५६दिनांक: २८जुलै २०२८वार: रविवार, रोजी वेळ: सकाळी ११:०० वाजता
—————————————–