साहेब! तुम्ही राजकारणात या हो’… एकवेळेस आमच्या शब्दात मन देऊन तालुक्याची धुरा हातात घ्या हो…
सर्वसामान्य जनतेचा हट्ट...
मुख्य कार्यकारी संपादक शंकर बर्डे
यवतमाळ :- पुसद विधानसभा अंतर्गत येणारे दिंडाळा हे एक गाव त्यांच गावालगत सात-आठ घराची वस्तीत डोंगराच्या पायाथ्याशी वसलेले जनुना या छोट्याशा गावात अत्येन्त गरीब व हालकीचे जीवन जगणाऱ्या वैद्य कुटूंबात जन्माला आलेला एक हिरा,त्यांचे नाव म्हणजे माधव रुख्माजी वैद्य, हे मुळातच हुशार शिक्षण घेवावं म्हटलं तर घराची परिस्थिती खूपच वाईट तरी पण शिक्षण घेयाची जिद्द मात्र सोडली नाही.
आपल्या आई-वडिलांच्या आशिर्वाने व आपल्या स्वकष्टाने शिक्षणाला सुरुवात केली , त्यांच्या शिक्षणाचा मार्ग येवढा खडतर होता कि त्यांना काम केल्याशिवाय दोन वेळेसची पोटाला भाकर मिळत नसे,त्यामुळे माधव वैद्य यांनी दैनंदिन मेनू प्रमाणे आपला प्रपंच चालू ठेवला सोमवार – शुक्रवार शाळा उर्वरित दोन दिवस आपल्या आई-वडिलांसोबत डोंगरावरील नर्सरीचे खड्डे करून अठाणे -रुपया मिळायचा त्यातच आपले शिक्षण घेयायचे,आपली परिस्थिती नाजूक आहे म्हणून खचून न जाता आपला संघर्ष, जिद्द चिकाटी कायम मनाशी अंगीकृत करून माधव वैद्य यांनी त्यांचे ध्येय गाठले आणि तो आपल्या आई वडिलांच्या आशिर्वाने साहेब झाला..
अशा या आत्येन्त बिकट परिस्थितीवर मात करून त्यांनी समाज कल्याण अधिकारी म्हणून पदभार स्वीकाराला माधव वैद्य साहेब आपल्या पदावर कार्यरत असतांना त्यांनी तळागाळातील गरजू कुटूंबीयांना मोठया प्रमाणात सहकार्य केले कारण त्यांच्या आई-वडिलांचे पूर्ण जीवन हे गरिबीत गेले असल्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव होती त्यांच्या अंगी ही मुळातच मनमोकळे पण असल्यामुळे तू त्या जातीचा हा या जातीचा असा साहेबांनी कुठलाही भेदभाव न करता,त्यांच्याकडे गेलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मदतीला धावून आले , त्या काळात त्यांच्याभागातील प्रत्येक व्यक्तीला धावून आले, साहेबांच्या समाजसेविहित त्यांनी समाज कल्याण विभाग,विभागीय समाज कल्याण उपायुक्त या पदावरून सेवा निवृत्त झाले….
म्हणूनच त्यांच्या पुसद विधानसभा अंतर्गत येणारी जनता पुन्हा एकदा वैद्य साहेबांनी राजकारणात येऊन आमची सेवा करावी, ही हट्ट धरून बसली आहे त्यांच्या या हट्ट व आग्रहस्तव त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटात प्रवेश करून राष्ट्रवादीची तुतारी हातात घेतली व त्यांनी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पद ग्रहण करून तालुक्याचे तुतारीचे नेतृत्व हातात घेतले.
आता तुतारी हातात घेऊन विधानसभा लढवा असा हट्ट तालुक्यातील सर्वसामान्य जनतेनी धरला आहे.
— सर्वसामान्य जनाता :- साहेब तुम्ही फक्त उभा टाका काय करायचं ते आम्ही करू,या तालुक्यातील जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तुम्ही काळजी करू नका पुन्हा एकदा तुम्हाला या पुसद तालुक्यातील जनतेची सेवा करण्याचे भाग्य लाभणार आहे यात काही शंका नाही विजयी आपलाच आहे असे सर्वसामान्य जनतेतून बोलले जात आहे.
माधव वैद्य साहेब हे मुळातच समाज सेवक आहेत त्यांची पुसद तालुक्यात देवदूत म्हणून त्यांची ओळख आहे. वैद्य साहेबांना पुसद विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आदरनीय पवार साहेबांनी एकवेळेस त्यांना संधी देऊन त्यांच्या रुपी एक नवीन चेहरा व एक सर्वसामान्य कुटूंबातील आमदार आपलाला पाहायला मिळेल यात काही दुमत नाही …
देविदास डाखोरे,
तालुकाउपाध्यक
(राष्ट्रवादी शरदचंद्र पवार तुतारी)
मुख्य कार्यकारी संपादक शंकर बर्डे