नाभिक समाजाने व्यसनापासून दूर राहा- महावीर शेठ श्रीश्रीमाळ
संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी.
हिमायतनगर शहरात महाराष्ट्र नाभिक महामंडळ तालुका शाखेच्या वतीने नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 31 ऑगस्ट रोजी हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान येथे सकाळी 11 वाजता पुण्यतिथी व भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करताना मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ यांनी असे सांगितले की नाभिक समाजांनी व्यसनापासून दूर राहून आपल्या परिवाराची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी व्यसनाच्या आहारी लागू नये असे अनमोल मार्गदर्शन केले
याबाबत सविस्तर वृत्त असे की संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 31 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नाभिक महामंडळ तालुका शाखेच्या वतीने संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम श्री परमेश्वर मंदिर देवस्थान येथे आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हिमायतनगर शहराचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड हे होते व कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी नेते दिलीप राठोड,आदर्श शिक्षक सचिन कळसे यांची उपस्थितीती लाभली होती या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेतला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित नाभिक समाज बांधवांना मार्गदर्शन करताना महावीर शेठ श्रीश्रीमाळ यांनी असे सांगितले की आजच्या तरुण पिढीने नाभिक व्यवसाय करत असताना व्यसनापासून दूर राहून आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती कशी करता येईल याकडे लक्ष द्यावे असे अनमोल मार्गदर्शन केले त्यानंतर माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी नाभिक समाज बांधवांच्या संत शिरोमणी सेना महाराज मंदिर व सभागृहासाठी नियोजित जागा देऊन येणाऱ्या काळात त्या ठिकाणी मंदिर उभारून देऊ असे आश्वासन दिले त्याबद्दल हिमायतनगर येथील महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या सर्व समाज बांधवांनी माजी नगराध्यक्ष राठोड यांचे आभार मानले
यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे नरसय्या अण्णा गंधम, व्यंकट अण्णा गंधम , प्रकाश घुंगरे, चंद्रकांत कळसे, रमेश लिंगमपल्ले, साहेबराव शिंदे,सचिन कळसे,तालुका अध्यक्ष गजानन चायल,उपाध्यक्ष नागेश शिंदे, रवी जोनापल्ले, गणेश वाघमबरे, राजू सुरजवाड, दत्ता सोळंके, अवधूत गायकवाड, ज्ञानेश्वर लिंगमपल्ले, आनंद गायकवाड, श्रीकांत घुंगरे, गोपाळ घुंगरे,तुकाराम पवार,सुनील शिंदे,अंकुश शिंदे,राजेश्वर लिंगमपल्ले, ज्ञानेश्वर सोळंके, चंद्रकांत सुरजवाड , बालाजी शिंदे ,वैभव घुंगरे सह आदी जन उपस्थित होते