आदिवासी मुला मुलींसाठी वस्तीगृह व वस्तीगृहची क्षमता वाढवा: खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची मागणी.
आदिवासी मुलां मुलींची वाढती संख्या लक्षात घेता वसतिगृह प्रवेश क्षमता वाढविणे गरजेचे असल्याचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांच्या निदर्शनास आले असता खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिं २९ जुलै रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी किनवट मेघना कावली यांना पत्र देण्यात आले आहे.
नांदेड शहरात आदिवासी मुला- मुलींसाठी प्रत्येकी २५० क्षमतेचे नविन वसतीगृह मंजुर करणे व सध्या सुरू असलेल्या नांदेड भोकर हदगाव हिमायतनगर किनवट माहूर येथील सर्व वस्तीगृहाची प्रवेश क्षमता १५० करण्याची मागणी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिं २९ जुलै रोजी पत्राद्वारे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी किनवट मेघना कावली यांना मागणी करण्यात आली असता आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मेघना कावली यांनी तातडीने प्रस्ताव शासनदरबारी पाठविण्यात येतील असे सांगितले सांगितले