कामारी येथे राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत वयोवृद्ध नागरिकांसाठी आरोग्य शिबीर संपन्न.
मुख्य कार्यकारी संपादक शंकर बरडे
आयुष्मान आरोग्य मंदिर (आयुष) आयुर्वेदिक दवाखाना कामारी येथे दिं ३० जुलै रोजी राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत वयोवृद्ध नागरिकांसाठी आरोग्य शिबीर (जेरियाट्रिक हेल्थ कॅम्प ) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल (भाप्रसे), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. सत्यनारायण मुरमुरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक(आयुष) डॉ.सुनिल भंडारे यांच्या मागदर्शनाखाली घेण्यात आले.या शिबीरामध्ये आयुर्वेद, युनानी, होमियोपॅथी नुसार निदान, सल्ला,समुपदेशन व चिकित्सा करण्यास आली. या अंतर्गत शिबीरामध्ये रक्तदाब, मधुमेह तसेच रक्त तपासणी व मोफत औषधी वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन धन्वंतरी देवतेची पूजन व दिपप्रज्वनाने करून कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच श्रीमती.सोनुले, प्रमुख पाहुणे, ता.आ.अ.डॉ.संदेश पोहरे साहेब, वैद्यकिय अधिकारी डॉ. टारपे, डॉ. रणवीरकर डॉ.सय्यद डॉ.अहिल्या तसेच डॉ.परभनकर यांनी समुपदेशन आणि मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक(आयुष) व आयुष वैद्यकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.या शिबीरात एकुण १९७ वयोवृद्धांची तपासणी करण्यात आली. शिबीर यशस्वी होण्यासाठी वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.