अतिवृष्टी भागात त्वरित सरसकट पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रुपयाची मदद जाहीर करावी :- पुसद काँग्रेस कमेटीची मागणी..
अतिवृष्टी मुळे सलग २ दिवसांपासून झालेल्या व सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील उभ्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे, तर घरा घरात पाणी शिरून पडझड झाली आहे काही भागात शेता काठील नाल्याचे बंधारे विहिरी शेततळे भुईसपाट झाली आहे. शेबाळपिंपरी पासून तर तालुक्याच्या बहूतांश भागात व शहर लागत गावे तसेच शहरातील पुरामुळे घराचे व व्यवसायाचे अतोनात नुकसान झाले. अशातच आपल्या कार्यालया मार्फत जलद गतीने पंचनामे करण्याची सुरवात केली ती प्रश्न्सनिया आहे मात्र पंचनामे करताना नुकसान ग्रस्त भागात फक्त ज्यांच्या कडे स्वतः च्या मालकीच्या घराचं पुरावा असलेल्या नुकसान ग्रस्त कुटुंबाचाच सर्वे करण्यात येत आहे मात्र ज्यांच्या कडे घराचा मालकीचा पुरावा नाही त्यांच्यावर अन्याय होतं असल्याचे निदर्शनात येत आहे याची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन जलद गतीने सरसकट पंचनामे करुन मदत जाहीर करावी तसेच शेतकरयांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे या वेळी प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक महसचिव सय्यद इस्ताक,काँग्रेस शहराध्यक्ष जिया शेख,तालुका काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष ज्ञानदीप कांबळे, अल्पसखायक जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल वाहब, माजी सरपंच आंनदा रनमले,युवा काँग्रेसचे शाहिद मिर्झा,एसी सेलचे तालुकाध्यक्ष राजकुमार ताळीकोटे,बळीराम चव्हाण,युवा काँग्रेसचे अध्यक्ष एसी सेल तालुका उपाध्यक्ष नागेश राऊत सह कार्यकर्ते उपस्थित होते.