Blog

हदगाव विधानसभे करीता कॉंग्रेस पक्षातर्फे उमेदवारीसाठी विकास पाटील देवसरकर इच्छुक!

प्रतिनिधी नांदेड अजिम हिंदुस्थानी 

विधानपरिषदेत विरोधी उमेदवाराला मतदान केल्याच्या संशयावरून आमदार जवळगावकर यांच्यावर पक्ष शिस्तभंगाच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस कडून नवीन उमेदवाराचा शोध काय?

हदगाव, नांदेड दि.३१ जुलै: विधानपरिषदेत विरोधी उमेदवाराला मतदान केल्याच्या संशयावरून आमदार जवळगावकर यांच्यावर पक्ष शिस्तभंगाच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कॉंग्रेसकडून हदगाव मतदारसंघा करीता नवीन उमेदवाराचा शोध सुरु असल्याच्या चर्चा सुरु असतानाच हिमायतनगर तालुका कॉँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विकास पाटील देवसरकर यांनी हदगाव विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली असून, त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हदगाव विधानसभा मतदार संघातून प्रबळ दावेदार मानले जात आहे.

१२ जुलै रोजी पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणूकीत कॉँग्रेस पक्षाची ७-८ मते फुटल्याची शक्यता प्रदेश कॉँग्रेस तर्फे वर्तवण्यात आलेली होती, त्यामध्ये हदगाव चे विद्यमान आमदार माधवराव जवळगावकर हेदेखील विधानपरिषदेत महायुतीच्या उमेदवारास मत दिल्यावरून संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले असून काॅंग्रेस तर्फे त्यांच्यावर चौकशीअंती कठोर कारवाईची शक्यता वर्तवली जात असल्याची चर्चा आहे असून आगामी निवडणुकीत त्यांची उमेदवारी कापली जाण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

या पार्श्वभूमीवर प्रदेश कॉँग्रेस कमिटीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हदगाव मतदारसंघातून इच्छुकांची चाचपणी सुरू केलेली आहे. यामध्ये हिमायतनगर तालुका कॉँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विकास पाटील देवसरकर यांचे नावे प्रामुख्याने घेतले जात आहे. युवक कॉँग्रेस पासून पक्षाशी जोडले गेलेले देवसरकर यांनी पक्षात आत्तापर्यंत विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत, त्यांच्या तालुका अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात दोन वेळा विधानसभा, हिमायतनगर नगरपंचायत, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ आदींवर कॉँग्रेस ला वर्चस्व राखता आल्याने देवसरकर यांना संधी दिल्यास आगामी विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेस ला नक्कीच विजयाची संधी राहील असे स्थानिक विश्लेषकांनी नमूद केले.या वेळी नांदेड कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम,हदगाव कॉंग्रेस कमिटी चे माजी अध्यक्ष बाबुराव पाथरडकर, शिक्षक सेल चे श्यामराव पाटील मनाठकर यांच्यासह अनेक कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}