देश
निधन वार्ता
किनवट तालुक्यातील जलधारा,येथील महादेव मंदिराचे मठाधिपती ह.भ.प. गुरुवर्य संत सत्यनारायण गणपती खुडे महाराज यांचे आज सकाळी ५.०० सुमारास वैकुंठवाशी गमन झाले.त्यांच्या या निधनामुळे पंचोकोशील वारकरी संप्रदाय परंपरेतील जलधारा व सोनपेठ येथील मठाचे मठाधिपती असल्यामुळे फड परंपरेतील हजारो समुदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.त्यांच्या पश्चात त्यांच्या एक मुलगा, सून, नातवंड असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवार दिनांक ३ आगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता महादेव मंदिर जलधारा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.