मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरसकट मतदार यादी नुसार लाभ द्या – सीमा स्वामी
विशेष प्रतिनिधी| विकास गाडेकर
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आपल्या राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ बहुतांश महिलांनी घेण्यासाठी वणवण सुरू करून योजनेचा लाभ मिळेल यासाठी महिला वाट पाहत आहे. मात्र,पोटासाठी बाहेर काम करणाऱ्या काही महिलांना या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे.असे अनेक महिलांची कैफियत आहे. तसेच एका वृतपत्रात प्रकाशित झालेल्या वृत्ताने महिलांची आता झोप उडवली असून आपली लाडकी बहीण चिंतेत आली आहे.त्या वृत्ताच्या हेड लाईन मध्ये म्हटलं गेलं की, लाडक्या बहिणीचा अर्ज इंग्रजीतच हवा… पुढे असंही म्हटलं की मागील भरलेले अर्ज बाद करण्याचा अजब आदेश ; पुन्हा इंग्रजीत अर्ज करावा लागणार त्यामुळे भाऊ (मुख्यमंत्री) लाडक्या बहिणीची थट्टा तर करतेय नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. मा. एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी बहिणीचा होणारा दैनंदिन आर्थिक भुरदंड,काम बुडवून योजनेच्या मागे लागणे हे थांबवून सरसकट योजना द्यावी जेणेकरून कोणीही वंचित राहणार नाही.शिवाय महाराष्ट्र हे पावन संतांची भूमी आहे. त्यामुळे मराठीला प्राधान्य द्यावे या अपेक्षेने मागणी सामाजिक कार्यकर्त्या सीमा स्वामी लोहराळकर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष यांच्या वतीने करण्यात येत आहे. सतत योजनेतील बदलामुळे आपल्या लाडक्या बहिणीला नाहक त्रास होणार नाही आणि जाचक अटीपासून सुटका मिळेल अशी अपेक्षा आहे. करिता आपणास निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाचा तात्काळ विचार करून तुमच्या माझ्या लाडक्या बहिणींचा विचार करावा अशी विनंती सह मागणी सीमा स्वामी लोहराळकर यांनी केली आहे.