देश
महाराणा प्रताप चौक येथे शाळकरी मुलांना शालेय साहित्य वाटप.
नांदेड शहरातील महाराणा प्रताप चौक येथे नागेश अण्णा मित्र मंडळ तर्फे शालेय मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटप दिं १५ ऑगस्ट रोजी ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त वाटत करण्यात आले आहे.तसेच या भागातील सुर्य प्रायमरी शाळा, नागा जुनी नगर, राजीव गांधी प्राथमिक शाळा व या भागातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी या सोहळ्याचा आनंद घेतला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या भागातील अब्दुल रौफ,(पत्रकार) सय्यद सादिक, रवी कुमार गायकवाड, शेख अखिल, सय्यद निजाम, आनंद कोंडा भास्कर, शेख शकील, शेख महबूब भाई, माधव गायकवाड, यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.