शालेय केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेला शासकीय आश्रम शाळा दुधड येथे सुरवात..
शंकर बरडे /हिमायतनगर तालुक्यातील दुधड/वाळकेवाडी :-(दिं,०४ ऑक्टोबर )दरवर्षी प्रमाणे याही वर्षी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट अंतर्गत प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा दुधड येथे शालेय केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धाला ४ आक्टोबर पासून सुरवात झाली आहे.या मध्ये क्रीडा व युवक संचालनालयाप्रमाणेच आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळेतील १४,१७,१९ या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी केंद्रस्तर,प्रकल्पस्तर, विभागीयस्तर व राज्यस्तरावर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे . सदर खेळ प्रकारात सांघिक स्पर्धा जसे की, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल, रिले तसेच मैदानी (वैयक्तिक) जसे की, धावणे १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, ६०० मीटर, ८०० मीटर, १५०० मीटर, ३००० मीटर, ५००० मीटर, लांब उडी, उंच उडी, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक याप्रकारच्या स्पर्धा घेण्यात येतील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि. २२ एप्रिल, २०१५ च्या शासन निर्णयान्वये आदिवासी विभागाने आयोजित केलेल्या राज्यस्तर शालेय क्रीडास्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना २५ वाढीव क्रीडा गुण देण्यात येतात. तसेच सदर स्पर्धेत पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत नोकरीसाठी ठेवलेल्या 5% आरक्षणाचा फायदा मिळतो.आदिवासी समाजातील गरीब मुले कुठे तरी वर जाऊन आपले व आपल्या शाळेचे नाव नमःलौकिक व्हावं या हेतूने आदिवासी विभागापार्फे खेळ घेतले जातात.आज रोजी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा दुधड येथे क्रीडा स्पर्धेला सुरवात.या प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास वाळके वाळकेवाडी सरपंच, प्रतिनिधी पांडुरंग चेलार, उपसरपंच संजय माझळकर, सामाजिक कार्यकर्ते शंकर बरडे,जेष्ठनागरिक तथा माजी सरपंच नारायण वाळके, पद्माकर सरकुंडे, सुरेश डवरे,सोमनाथ डवरे,आयोजक शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद चामे सर,सूत्रसंचालक अडबलवार सर,क्रीडा मार्गदर्शक क्रीडा शिक्षक सचिन शिंदे सर,, जगदाळे सर, मंगणाळे सर,निक्कम सर,सूर्यवंशी सर, राठोड सर,अगलावे सर, मनोहरे सर,जाधव सर,
मुधोळकर सर, सरोदे सर, बोरवंडकर सर, भूरेवार सर, दासरे सर, शातलवार सर, क्रिडाशिक्षक जगदाळे सर, घुंगरडे सर, खान सर, गायकवाड सर, नावंदिकर मॅडम, भुरके सर, डूडुळे सर, खरोडे सर, खोकले सर, हाराळे सर, अ वाणोळे मॅडम, कांबळे मॅडम, सोनवणे मॅडम, सहस्त्रकुंड येथील नाईक सर, आढाव सर, जाधव सर , नाईकनवरे सर,घिमेकर मॅडम, वाघमारे मॅडम, एकघरी येथील राठोड सर, कुमरवड सर, अहुलवार मॅडम ,वैद्य सर, ढोले सर, गुट्टे सर, डोंगरे सर, सोमवारे सर, व इतर शाळेचे मान्यवर आदी शिक्षक उपस्थित व सर्व गुरुजन वर्गांचं आणि मान्यवरांच मोलाचं योगदान लाभले