कार दुचाकीच्या भिषण अपघातात एकजण जागीच ठार…
कार ने मोटरसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार.
हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथील रहिवासी आनंद किशनराव मिराशे अंदाजित वय ४५ हे नेहमीप्रमाणे सरसम गावातून सरसम आबादी येथे किराणा दुकान उघडण्यासाठी जात असताना अचानक पाठीमागून एका चार चाकी वाहन क्रं एम एच १४ इ सी ९४७२ नंबरच्या कार ने सरसम ते सरसम आबादी दरम्यान दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भिषण अपघात झाल्याची घटना आज दिं १० ऑगस्ट रोजी सकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास घडली असून या अपघातात दुचाकीस्वार सरसम येथील आनंद किशनराव मिराशे यांचा जागीच मृत्यू झाला असून चार चाकी वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे सरसम येथील नागरिकांमधून बोलल्या जात आहे.
या घटनेची माहिती हिमायतनगर पोलीसांना कळताच पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार ए, एस,आय,कदम ,विजय कुमार,आवुलवार यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला व आपघातीत मृत्यू झालेल्या आनंद किशनराव मिराशे यांना शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम येथे हलविण्यात आले आहे..