सोनारी फाटा येथील दवाखान्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिर..
सोनारी फाटा येथे हिना क्लिनिक नावाने एका दवाखान्याचे आज दिं ५ ऑगस्ट रोजी शुभारंभ होणार असून पहिल्याच दिवशी परिसरातील संपूर्ण नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे तरी संपूर्ण नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान डॉ सैफ शेख यांनी केले आहे..
हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा परिसरातील नागरिकांना उपचारासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन उपचार करावा लागत असुन वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे या भागातील नागरिकांना उपचारासाठी धावपळ करावी लागत होते मात्र आत्ता नांदेड किनवट रोड सोनारी फाटा येथे हिना क्लिनिक दवाखान्याचे दिं ५ ऑगस्ट रोजी शुभारंभ होणार असून आहे तसेच येथील दवाखान्यात शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना वेळ ११:०० ते ५:०० वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार असून या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आव्हान डॉ सैफ शेख यांनी केले आहे