देश
लाडक्या भावाला राखी पाठविण्यासाठी एकवटल्या लाडक्या बहिणी..
हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी येथील सरपंच सौ. मेघा ताई पवन करेवाड यांच्या कल्पनेतून सर्व भगिनी आपल्याला लाडकी बहीण म्हणून सन्मान देणाऱ्या मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांना राखी पाठवून नातं सार्थ करण्याचा निर्णय घेतला.
श्रियाळ राजाच्या मिरवणुकीत सर्व भगिनीं यांनी काल एकत्र येऊन राख्या पाठविल्या या प्रसंगी काही महिलांनी.वेड्या बहिणीची वेडी ही माया असे गीत सुद्धा सादर केले.मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बहिणीचा सन्मान दिला तेंव्हा आम्ही बहिणी सुद्धा आमच्या भाऊरायाच्या पाठीशी आहोत अस्या प्रतिक्रिया महिला वर्गातून येत होत्या.ही अनोखी भेट मुख्यमंत्र्यांना भारावुन टाकणारी नक्कीच असेल या संकल्पनेतून पाहायला मिळत आहे.