पालक मिळाव्यात गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न..
पीर मोहम्मद उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आर्ट ऑफ सायन्स मेहकर येथे पालक मिळावा व गणवेश वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्याचप्रमाने दिं १० ऑगस्ट २०२४ रोज कार्यक्रम संपन्न झाला असून या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मेहकर नगर परिषद चे मा. नगराध्यक्ष अलहाज कासम पीरु गवळी होते. व कार्यक्रमाचे अध्यक्ष नवाज कासम गवळी अध्यक्ष पीर मोहम्मद उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मेहकर होते तसेच शाळेचे संचालक हुसेन भाई गवळी अब्दुल गवळी कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी व असंख्य पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मा कासम भाई गवळी यांनी आपल्या भाषणात मुलांना मार्गदर्शन केले तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या पदाचा परीचय दिले आलेल सर्व पालक व विद्यार्थी साठी शाळेचे अध्यक्ष नवाज कासम गवळी यांच्या तर्फे भोजनाची व्यवस्था केली होती या वेळी प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते विद्यार्थांना ५ वी ते १२ वी पर्यंत गणवेश (कपडे) व वर्ग 9 ते 12 वी पर्यंत बुरखा (नकाब)वाटप करण्यात आले तसेच कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले व या वेळी प्रस्ताविक अहेमद सर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सैय्यद इम्रान सर यांनी आभारप्रदर्शन शाळे चे प्राचार्य मो जावेद गवळी सर यांनी केले.