दुधड – वाळकेवाडी येथे विविध कामाचे भूमिपूजन व शाखेच्या पाटीचे लोकार्पण संपन्न..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे जिल्हाध्यक्ष बाबुराव कोळीकर यांच्या हस्ते करण्यात आले..
हिमायतनगर तालुक्यातील दुधड येथे पुनर्वसित निधीतून सांस्कृतिक सभागृह,सी,सी रस्त्याचे जवळपास २.४९ लक्ष रुपयांची निधी उपलब्ध करुन दिं ११ ऑगस्ट रोजी कामांचे भूमिपूजन बाबुराव कोहळीकर यांच्या हस्ते करण्यात आले..
हिमायतनगर तालुक्यातील दुधड – वाळकेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या वडाची वाडी, बुरकुल वाडी, वाळकेवाडी येथे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष बाबुराव कोळीकर यांच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी निधी मंजूरी मिळवून आणले असता या कामांचे भूमिपूजन करण्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याच प्रमाणे दिं ११ ऑगस्ट रोजी दुधड- वाळकेवाडी येथील गावकऱ्यांच्या उपस्थित येथील विकास कामांचे नारळ फोडण्यात आले आहे.तसेच एकनाथ शिंदे शिवसेना शाखेच्या पाटीचे वाळकेवाडी,वडाचीवाडी, बुरकूलवाडी येथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते लोकार्पण सुद्धा करण्यात आले.
येथील शाखेच्या पाटीचे उद्घाटन केल्यानंतर येथील नागरिकांशी बाबुराव कदम यांनी संवाद साधला व त्यांना सभागृह देण्याचे आश्वासन दिले.वडाचीवाडी ग्रामस्थांशी सवांद साधतांना तेथील ग्रामस्थांकडून कळाले कि त्यांनी सर्व नागरिकांच्या सहकार्याने वीस वर्षांपूर्वी असणारा दोन हजाराचा व्यवहार आजच्या घडीला दीडीवाडी करून त्यांनी कोटी रुपयांच्या घरात घातला व ते पैसे गावाच्या विकासकामांसाठी खर्च करीत असून , एक दर्शनीय हेमांड पणती मारोती मंदिराचे बांधकाम केले या गोष्टी पाहुन बाबुराव कदम आश्चर्य चकित झाले व त्यांनी येथील काही जेष्ठ मंडळीचे स्वागत केले.