दरवर्षीप्रमाणे हिमायतनगर तालुक्यातील कांडली तांडा येथे तीच उत्सव..
कांडली तांड्यातील नाईक कारभारी डावो साने यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. बंजारा तीच उत्सव म्हणजे समाजातील अविवाहित मुलींच्या जीवनातील प्रत्येक वर्षात येणारा श्रावण मास नव्हे आनंद पर्वच.तांड्याचा प्रमुख म्हणजे नायक व कारभारी 10 दिवस असणारा हा उत्सव नायकाच्या घरुनच सुरु होतो.वसंतराव नाईक यांच्या विचाराने प्रभावित,सेवालाल महाराज यांच्या रक्ताच्या समाजातील प्रत्येक माणसाचे बंजारा चळवळी करीता रक्त सळसळल्या शिवाय राहत नाही.हिच खरी गोर संस्कृती असून ती जतन करण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांची आहे.बंजारा तीच उत्सव -काय आहे ?याच्याबद्दल माहिती थोडक्यात नितीन राठोड कांडलीकर यांनी सांगितले तीच म्हणजे एक बंजारा पारंपारिक नृत्य व कला सादर करण्यासाठी उपयोगी पडणारा कार्यक्रम म्हणजे तीच आहे. लहान मोठे सगळे गाण्याच्या सुरावर तीज वसर्जनातील हे मुलींचे गाने लोकगीत ऐकून क्षणभर मनाला विलक्षण भुरळ पडतो.तीच वसर्जनातील हे मुलींचे गाने बोरडीर बोर खाटे मिठे बोर,तम लागजा जो तम झड़जा जो,छोरी चाळो लगाइये चरमटडी,ये नायेकेरे घरिआंग चरमटडी,या गितावर तीच विसर्जन मिरवणुकीत बाल, तरुणाई,वयोवृद्ध स्त्री पुरुष मंडळी थिरकल्या शिवाय राहत नाही.