कारंजा शहरातील विविध भागात राहणारे नागरिकांसमोर समस्यांचे डोंगर निर्माण झाले आहे, कारंजा शहरात नगरपरिषद आहे की नाही? शहराची अवस्था पाहील्यानंतर हा प्रश्न निर्माण होतो,शहरातील अनेक ठिकाणावरील नागरीकांनी विविध समस्यांची तोंडी तक्रार घेऊन सुद्धा नगरपरिषद प्रशासन कडे गेले परंतु त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात येत नाही असे नागरिकांचे म्हणणे होते,शेवटी शहरात सामाजिक श्रेत्रात काम करणारे हजरत टिपु सुल्तान सेनेचे वाशिम जिल्हा अध्यक्ष अब्दुल राजीक अब्दुल अजीम व समाज सेवक मोहम्मद सलीम तेली, यांनी शहरातील विविध परिसरात पाहणी करून नागरिकांच्या समस्यांचे लेखी निवेदन कारंजा नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांना दिनांक २४/०८/२०२४ ला दिले,सदर निवेदनात असे म्हटले आहे की, शहरातील अल्कबीर नगर, लीलावती काॅलोणी, गुरुदत्त नगर, लोकमान्य नगर, रहमान नगर, गौस नगर, अतुल नगर, नशेमन नगर, समता नगर, श्रीनाथ नगर, आजम नगर,या परिसरात मागील ८ ते १० वर्षांपासून नागरिक परिवरासह राहत आहे, परंतु त्यांना पावसाळ्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे,वरील परिसरात पक्के रस्ते नाही, नाल्यांचे बांधकाम नाही,कच्चे नाल्या सुध्दा नसल्याने घरातील सांड पाणी रस्त्यावर साचत असल्याने आरोग्याला धोकादायक आहे, लहान लहान शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाणे येणे करण्यासाठी व नागरिकांना जाणे करण्यासाठी तारेवरची कसरत करुन गेल्या सारखे जावे लागत आहे, रस्त्यावर खड्डे पडले आहे,पाऊस आल्यावर खड्यात पाणी भरूण असते त्यामुळे पायी जात असतांना खड्डे दिसत नाही, अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, रस्त्यावर चिखल राहत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो,सदर परिसरातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण लवकरात लवकर करावे तसेच सदर परिसरात रस्ते व नाल्यांचे बांधकाम लवकर लवकर करावे अश्या मागणीचे निवेदन हजरत टिपु सुल्तान सेनेचे वाशिम जिल्हा अध्यक्ष अब्दुल राजीक अब्दुल अजीम व समाज सेवक मोहम्मद सलीम तेली यांनी कारंजा नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांना दिले आहे.
Related Articles
Check Also
Close
-
पळसपुर येथील लहान बालकांचे अश्रू लोकप्रतिनिधी पुसतील का ?November 15, 2024