प्रतिनिधी अब्दुल रौफ/नांदेड पोलीस अधीक्षक,अविनाश कुमार यांनी नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अंमली पदार्थाची ब्रिक्री करणारे व्यक्तींची माहिती काढुन, त्यांचे विरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्या अनुषंगाने (Operation flush out) अंतर्गत पो.नि.श्री.उदय खंडेराय, स्थानिक गुन्हे शाखा,नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस उप निरीक्षक श्री.आनंद बिचेवार यांना दिं ०६. सप्टेंबर रोजी माहिती मिळाली की, नांदेड शहरात एक इसम अंमली पदार्थ अफीम ची विक्री करण्यासाठी येणार आहे.सदरची माहिती वरिष्ठांना देवुन, महसुलचे राजपत्रित अधिकारी श्री.एस.व्हि.दिघलवार, नायब तहसिलदार, नांदेड यांच्यासह शासकिय पंच व पोलीस अंमलदार यांच्यासह साफळा रचुन, पोलीस ठाणे वजिराबाद हद्दीत बंद असलेल्या सचखंड सिख हॉस्टेलच्या इमारतीसमोर मोकळ्या जागेत छापा मारुन काट्या कुटयाचे झुडपाच्या आडोशाला इसम सुखविंदर सिंघ सुरेंद्रसिंघ कालो वय २८ वर्ष व्यवसाय बेकार रा. गुरुव्दारा गेट क्रं. ०४, बडपुरा, नांदेड हा संशयीत रित्या बसलेला दिसुन आला. त्यास ताब्यात घेवुन अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात लोकांना विक्री करण्याचे उद्देशाने आणलेला २७ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ अफीम व एक इलेक्ट्रीक वजन काटा असा एकुण रु.५,९००/ रुपयांचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला असून त्या इसमा विरुध्द पोलीस ठाणे वजिराबाद येथे गु.र.नं. ४४६/२०२४ कलम ८(C), १७ (B) एन. डी. पी. एस. अॅक्ट १९८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा माल हा कोठुन आणला याबाबत पुढील तपास चालु आहे.सदरची कामगीरी मा.श्री.अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड,मा.श्री.खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक,भोकर,मा.श्री.सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. उदय खंडेराय, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड, सहा. पोलीस निरीक्षक श्री.आर.डी.वटाने,पो.स्टे. वजिराबाद, पोलीस उप निरीक्षक श्री. आनंद बिचेवार,पोलीस अंमलदार गंगाधर कदम, प्रभाकर मलदोडे, किशन मुळे, संजीव जिंकलवाड, ज्वालासिंघ बावरी, धम्मानंद जाधव, संतोष बेलुरोड, हेमंत बिचकेवार, महिला पोलीस अंमलदार किरण बाबर यांनी कार्यवाही यशस्वी पार पाडल्यामुळे वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Related Articles
Check Also
Close
-
पळसपुर येथील लहान बालकांचे अश्रू लोकप्रतिनिधी पुसतील का ?November 15, 2024