हिमायतनगर तालुक्यातील या संपुर्ण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालय राहण्यास सक्ती करा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा..
हिमायतनगर तालुक्यातील ग्रामसेवक,ग्राम विकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषि सहाय्यक, आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय येथील कर्मचारी व अधिकारी हे मुख्यालयी न राहता सोयीच्या ठिकाणाहून ये-जा करीत असल्यामुळे शेतकऱ्यांसह तालुक्यातील संपूर्ण जनतेचे हाल होत असून नाहक त्रास सहन करावं लागत असल्याने प्रहार जण शक्ती पक्षाचे तालुका प्रमुख दत्ता पंडितराव देशमुख यांच्या वतीने निवेदनाद्वारे तालुक्यातील संपूर्ण विभागांतील कर्मचारी अधिकारी यांना मुख्यालयी राहण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वर्त असे की हिमायतनगर तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजुर, दिव्यांग, निराधार, विधवा, अनाथ व शैक्षणिक विद्यार्थी यांचे अनेक कामे हे ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषि सहाय्यक, आरोग्य अधिकारी हे त्यांना नेमुन दिलेल्या ठिकाणी राहत नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असुन त्यांच्या अभावी अनेक जणांची कामे तशीच खोळंबून राहत असल्याचे पाहायला मिळत आहे,काही विद्यार्थ्यांचे प्रवेश सुध्दा रखडले व काही विद्यार्थ्यांना तर शिक्षणांपासून वंचित सुध्दा राहावे लागत आहे.तसेच हिमायतनगर तालुक्यातील ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषि सहाय्यक, व पंचायत समिती, तहसील कार्यालय, भुमी अभिलेख कार्यालय येथील कर्मचारी व अधिकारी आपल्या सोयीनुसार रेल्वेच्या वेळापत्रकानुसार भोकर नांदेड हिंगोली व त्यांच्या सोयीनुसार ये जा करीत असल्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील नागरीकांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना व विद्यार्थ्यांना अत्यंत गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे, तरी वरील सर्व कर्मचारी, अधिकारी हे मुख्यालयी राहण्यांसाठी त्यांच्यावर वरिष्ठांनी योग्य ती दखल घेवून मुख्यालय राहण्यासाठी सक्ती करावी तसेच मुख्यालय न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर योग्य कार्यवाही करावी, अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करुन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे निवेदन दिं २८.ऑगस्ट. देण्यात आले होते, मात्र आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे मराठवाडा मुफ्ती संग्राम दिनी दिं १७ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय हिमायतनगर येथे वराह पुजन उपोषणास बसण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे हिमायतनगर तालुका प्रमुख यांच्या वतीने दिं.६/सप्टेंबर रोजी हिमायतनगर तहसील कार्यालय पंचायत समिती येथे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.यावेळी संगपाल नामदेव प्रधान शाखा वारंटाकळी अध्यक्ष, विजय अशोक खाते, दत्ता तुकाराम आंबोपवाड सरसम सिरंजनी संर्कप प्रमुख अध्यक्ष, गजू आनंद बच्कलवाड, शेषराव मारुती राणे, शंकर नारायण कदम, माधव दिगंबर कानोटे शहर अध्यक्ष, विश्वंभर कोंढवा कानोटे तालुका उपाध्यक्ष, सुरेश मकाजी टोकलवाड, बापूराव दादाराव हाके उपस्थित होते.