पारंपारिक शाहीर लोककला सवध॔न मंडळ हदगाव तालुका अध्यक्ष पदी शाहीर माधव वाठवे यांची निवड..
नादेड. कलावंतांच्या न्याय हक्का करिता सदैव तत्पर असलेल्या पारंपारिक शाहीर लोककला सवध॔न मंडळ हदगाव तालुका अध्यक्ष पदी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नामवंत शाहीर माधव वाठवे रुईकर यांची पारंपारिक लोककला शाहिरीमहोत्सव व स्मृतीशेष गुरुवर्य एम पी भवरे कामारीकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा पोटा.बु.तालुका हिमायतनगर येथे 14 ऑक्टोंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात आमदार माधवराव पाटील जवळगावकर पारंपारिक शाहीर लोककला वर्धन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा. भवरे कामारीकर प्रदेश अध्यक्ष शाहीर रमेश नारलेवाड प्रदेश प्रवक्ते लक्ष्मणराव मा भवरे मधुबावलकर गझलकार आदिलाबाद जिल्हा अध्यक्ष शाहीर बापूराव जमदाडे पत्रकार विजय वाठोरे. शाहीर सुभाष गुंडेकर शाहीर शिवाजी डोखळे किसनराव ठमके अविनाश कदम शाहीर शंकर गायकवाड संतोष भाऊ पुलेवार दत्ताभाऊ पवार तुकाराम अडबलवाड सरसमकर नागोराव मेंढेवाड पत्रकार के.एस. वाघमारे जळबा जळपते केशव माने परमेश्वर वालेगावकर नागनाथ बच्चेवार पत्रकार आनंदा जळपते पत्रकार पांडुरंग मिरासे जे.सी.नरवाडे.आदी मान्यवरांच्या हस्ते शाहीर माधव वाढवे यांना नियुक्तीपत्र देऊन निवड केली आहे शाहीर माधव वाढवे यांचे सामाजिक सांस्कृतिक कार्यात मोठे योगदान आहे त्या दृष्टीने त्यांनी कलावंतांच्या एकजुटी करिता प्रयत्न करावे पारंपारिक शाहीर लोक कला संवर्धन मंडळाच्या गाव तिथे शाखा स्थापन करून कलावंतांचे संघटन मजबूत करावे या करिता पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा. भवरे कामारीकर यांनी त्यांची निवड केली आहे शाहीर माधव वाढवे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे कलावंतांकडून कौतुक होत आहे