रा स्व संघ ढाणकी नगराचा विजयादशमी उत्सव व शस्त्र पूजन २० ऑक्टोबरला विद्यावाचस्पती,प्रा दिलीपजी जोशी येणार..
ढाणकी प्रतिनिधी आसिफ खान पठान/राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ढाणकी शहराचा विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन कार्यक्रम यावर्षी 20 ऑक्टोबर 2024 ला, रविवारी येथील आर्य वैश्य भवन परिसरात होणार आहे, यावर्षी संघाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत, अत्यंत खडतर प्रवास करत, संघ आपल्या लक्ष्याकडे आगेकूच करताना समाज पाहत आहे, अनेक स्वयंसेवकांनी आपल्या वयक्तिक परिवाराची तमा न बाळगता संघांचे काम पुढे सरकवले आहे, अनेक पिढ्या संघाच्या पवित्र कामासाठी खपल्या,त्यांच्याच पुण्याईने संघाला अनुकूल परिस्थिती पाहायला मिळत आहे, या शताब्दी वर्षात संघांचे पुढील ध्येयधोरण कसे असतील याची आतुरता हिंदूसमाजाला आहे, ढाणकी शहरात स्वयंसेवकांचे मुख्य मार्गाने पथसंचलन होणार आहे, पथसंचलन झाल्यानंतर प्रमुख वक्ते व प्रमुख अतिथी यांचे मार्गदर्शन होणार,शहरातील सर्व व्यापारी बंधू व नागरिकांनी या कार्यक्रमाला सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन संघांचे संपर्क प्रमुख आनंद येरावार व तालुका कार्यवाह महारुद्र बिबेकर यांनी केले आहे,