राजनीति
जिंतूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव सुरेश भैय्या नागरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मा.जिल्हा परिषद अध्यक्ष परभणी तथा राष्ट्रवादी काँग्रेस जिंतूर- सेलू विधानसभा अध्यक्ष श्री.प्रसादराव बुधवंत,धनगर समाज उन्नती मंडळ परभणी जिल्हाअध्यक्ष श्री.अनंतराव कोरडे मामा,कवडा येथील सरपंच श्री.राजेश चव्हाण,मा.नगरसेवक नियाजू खान गफुर खान उर्फ न्याजुलाला,मा.नगरसेवक अफसर बेग, सामाजिक कार्यकर्ते याया खान, सामाजिक कार्यकर्ते अयुबभाई सदर, सामाजिक कार्यकर्ते सय्यद मुस्तफा आदींचा आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री.नानाभाऊ पटोले साहेब यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये जाहिर प्रवेश झाला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्री.सुरेश भैया नागरे,जिल्हाकार्याध्यक्ष श्री नानासाहेब राऊत,विशालराव बुधवंत,शहराध्यक्ष बासू खान,सुधाकर नागरे आदी उपस्थित होते.