क्राइम
वसमत फाटा येथे ऑटो चालकला चाकुचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करत जखमी केल्याची घटना- अर्धापुर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..
अर्धापूर येथील शेख सोहेल शेख अन्सार ऑटो चालकांवर दिं २१/ऑगस्ट रोजी रोजी रात्री वसमत फाटा येथे ११:०० वाजण्याच्या सुमारास तीन तरुणांनी अडवून चाकुचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न ऑटो चालक शेख सोहेल यांना जखमी केल्याची घटना घडली आहे..
नांदेड अर्धापूर मार्गावरील वसमत फाटा येथे दिं २१ ऑगस्ट रोजी रात्री ११:०० वाजण्याच्या सुमारास ऑटो चालक शेख सोहेल शेख अन्सार व त्यांचा एक मित्र शेख सलमान शेख अकबर रा. बरकतपुरा अर्धापुर हे दोघेजन ऑटो क्रमांक MH-26-G-6501 नंबरच्या ऑटो ने नांदेड मार्गाने अर्धापूर येथे घरी येथे घराकडे जात असताना वसमत फाट्याजवळ एका व्यक्तीने ऑटो थांबविण्यासाठी हात दाखविला असता ऑटो थांबविला नसल्याने, त्या सोबत असलेल्या दुसऱ्याने ऑटो समोर येवुन ऑटो जबरदस्तीने थांबवून खिशातुन चाकु (धारदार शस्त्र) काढुन गळ्यावर ठेवुन जवळील शेख सोहेल व पाठीमागे बसलेल्या मित्राला जेवढे पैसे असतील ते पुर्ण पैसे व तुमच्या दोघांकडील मोबाईल द्या नाहीतर चाकुने मारेल अशी जिवे मारण्याची धमकी देत डाव्या हाताने, गळ्याजवळ चाकु धरलेल्या हाताला शेख सोहेल यांनी झटका देऊन सुटका करण्याचा प्रयत्न केला असता तो चाकु शेख सोहेल यांच्या डाव्या हाताच्या खंद्यावर त्या व्यक्तीने मारले असुन ऑटोच्या बाहेर निघताना समोरील व्यक्तीने पुन्हा डाव्या बाजुचे पोटाच्या दिशेने पोटात चाकूने वार करुन गंभीर जखमी केले, त्याच वेळेस मागच्या शिटवर बसलेला मित्र शेख सलमान ऑटो च्या बाहेर आला व चाकू मारुन जखमी करणाऱ्या व्यक्तीला पकडून त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव नागेश माधवराव लोटे रा.वसमत असे सांगीतल्यावर त्याच्या
जवळील चाकू हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला असता नागेश लोटे ने दोघांना हिसका देवुन वसमत रोडच्या दिशेने पळाला व थोडे पुढे जावुन एका मोटारसायकलवर दोन ईसम बसलेले होते त्या मोटारसायकलवर नागेश लोटे बसुन ते तिघेजन वसमत रोडच्या दिशेने पळुन गेल्याची घटना घडली असता.त्यानंतर लगेच त्याठिकाणी वसमत फाटा महामार्ग पोलीस चौकीवरील पोलीसांनी धाव घेतली आणि जखमी झालेल्या शेख सोहेल यांना शासकीय रुग्णालय अर्धापुर येथे हलविण्यात आले होते. शासकीय रुग्णालय अर्धापूर येथे प्राथमिक उपचारानंतर शासकीय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले असून शासकीय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे जखमी झालेल्या शेख सोहेल यांच्यावर उपचार सुरू असल्याचे शेख सोहेल यांनी सांगितले आहे.तसेस शेख सोहेल यांच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस स्टेशन येथे नागेश माधवराव लोटे रा. वसतम व त्याचे सोबतचे मोटारसायकलवरील दोन अज्ञात व्यक्तीविरुद्ध अशा तिघाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले आहे