जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे नांदेड जिल्ह्यातील तरुण तरुणींसाठी मोठे आव्हान. या योजनेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा..
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणासाठी संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील युवा वर्गाने ऑनलाइन अर्ज करून प्रशिक्षण घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे..
महाराष्ट्रात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला सुरूवात केली आहे.या योजनेचे नांदेड जिल्ह्यातील २१ ते ३५ वयोगटातील तरुण-तरुणी युवकांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचे ऑनलाइन अर्ज rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर लॉगिन करून आपली नोंदणी किंव्हा मागणी नोंदवावी आणि या योजनेद्वारे प्रशिक्षण घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.२१ ते ३५ वयोगटातील तरुण-तरुणी पुर्ण शिक्षण केल्यानंतर कुठे ही नोकरी मिळवण्यासाठी अर्ज करतांना अनुभव विचारला जातो त्यासाठी या योजनेच्या माध्यमातून अनुभव मिळवण्याकरिता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविल्या जात आहेत.तसेच सहा महीण्याची प्रशिक्षण मिळवण्याची संधी आहे आणि प्रशिक्षण आर्थिक म्हणून दहावी पास असणाऱ्यांना ६,००० बारावी पास असणाऱ्यांना ८,००० आणि जास्त शिक्षण असणाऱ्यांना १०,००० मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले आहे..