राजनीति

सरपंचाला कंटाळून ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा मंजूर करण्याची सदस्याची मागणी..

लिहेदिगर ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत ग्रामपंचायत सदस्य म्हणून परिचित असलेल्या सुमन मदनसिंग चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य, लिहेदिगर.यांनी येथील सरपंचाला कंटाळून ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा गटविकास अधिकारी मार्फत तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे…

जामनेर तालुक्यातील लिहेदिगर येथील
ग्रामपंचायत सदस्य म्हणून निर्वाचीत असलेल्या सुमन मदनसिंग चव्हाण हे येथील सरपंचाला कंटाळून ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.येथील सरपंच यांनी आपल्या
अधिपत्याखाली चालू असलेल्या कामकाजाबद्दल मी विद्यमान सदस्य असतांना मला कोणत्याही प्रकारे कुठल्याही कामकाजाबद्दल विचारपूस न करता तसेच मला विश्वासामध्ये न घेता ग्रामसेवक व सरपंच असे दोघेही संगनमत करुन परस्पर कामे करत आहे. परंतु मला ज्या मतदारांनी अपेक्षेने मतदानाद्वारे निवडून दिले आहेत त्या जनतेचे
प्रश्न व अडी-अडचणी मला सोडवता येत नाही. तसेच कोणतेही कामे मार्गी लावता येत नाहीत. त्यामुळे जनतेत माझ्या विषयी नाराजीचा सूर असल्याने तथापी माझ्याकडून गोरगरीब जनतेच्या कामास या दोघांकडून वारंवार अडचण होत असुन शासनाच्या नियमानुसार, ग्रामपंचायत सदस्यांना प्रत्येक मिटींग वेळी भत्ता दिला जातो. तो भत्ता ३ वर्षे ६ महिने उलटून देखील आजपर्यंत महाराष्ट्र शासनाने भत्ता देखील दिलेला नाही. तसेच सरपंच यांनी तीन वर्षे मी स्वतःच सत्ता उपभोगीन व नंतरचे दोन वर्षे दोन सदस्यांना प्रत्येकी १ वर्ष प्रमाणे सत्ता देईल असे अंदाजे ३०० ते ३५० लोकांसमोर वचन देवून बोलणी करुन देखील स्वतः सरपंच बदलून गेले व सरपंच पद दिले नाही म्हणून मी सदरच्या अडीअडचणीला कंटाळून नाईलाजास्तव माझ्या ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे निवेदनात नमूद करून दिं.०२ ऑगस्ट रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती, जामनेर जिल्हा. जळगांव यांच्या मार्फत तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव. यांच्या कडे निवेदनाद्वारे ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}