क्राइम

जमिनीच्या एन ए .मध्ये अफरातफर केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा..

अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा-पाशा खतीब यांनी दिला आहे.

प्रतिनिधी अजिम हिंदुस्थानी 

हिमायतनगर नगरपंचायत कार्यालयामध्ये सध्या भूखंड माफीया यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे आपल्या नोंदी लावण्याचे काम चालू केले आहे. नगरपंचायतीच्या अभिलेखावर खाडाखोड करून मुख्याधिकारी कार्यालयीन अभियंता लिपीक यांना हाताशी धरून अभिलेखाचे खडाखोड करून महसूल विभागाचे गणावर दस्तावेज व क कृषी  याने लेआउट परवाने दिल्याचे बनावट कागदपत्रे आधारे घेणे चालू आहे. सदरची माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार पाशा खतीब यांनी नगरपंचायतला टाकलेल्या माहिती अधिकाराच्या पत्रातून मिळाली आहे.

याविषयी सविस्तर वृत्त असे की शासनाने दिलेल्या (UDCPR ) एकत्रीकरण विकास नियंत्रण, प्रोत्साहित नियमावली प्रमाणे लेआउट मंजुरी देण्याचे शासनाचे धोरण आहे परंतु नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी कार्यालयीन अधीक्षक अभियंता यांनी शासनाचे आर्थिक नुकसान करण्याच्या उद्देशाने शहरातील गट, क्रमांक सर्वे क्रमांक 254, 284, 285, 227, 173, 283, 304/3, 304/4 या गटाचा कोणताही विकास न करता त्या गटामध्ये कायदेशीर अंतर्गत 40 फुटाचे रस्ते, आरसीसी रोड, नाली विद्युत पोल पाण्याची व्यवस्था भूमिगत गटार तसेच अमेनिटी स्पेस, ओपन स्पेस सोडलेले नसून यामुळे भूमाफियाचा फायदा झालेला आहे. जर या लेआऊट मध्ये विकासाची कामे झाली असती तर शासनाच्या तिजोरीवर आर्थिक भुर्दंड आला नसता अशा पद्धतीने हिमायतनगर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कार्यालयीन अधीक्षक अभियंता, लिपिक, भूमाफिया यांनी कागदपत्रामध्ये खेळ करून बनावट कागदपत्रे महसूल विभागात आणून देत ते खरे असल्याचे भासवून शासनाचा आर्थिक महसूल बुडविला आहे. नगरपंचायत हिमायतनगरचे मुख्याधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, अभियंता, लिपिक यांनी संगनमत करून बनावट कागदपत्र आधारित कागदपत्रे खरे असल्याचे भासवून शासनाचा महसूल बुडवून नमुना क्रमांक 43 चा इतर नगरपंचायतीच्या अभिलेखावर यांनी लिहायचा खोट्या नोंदी घेऊन ते खरे असल्याचे दाखवून महसूल विभागाचे फसवणूक करत शहरातील गट क्रमांक सर्वे क्रमांक 254, 284, 285, 257, 173, 283, 304/3, 304/4 या सर्व क्रमांकाची शासनाच्या निकषानुसार व नियमानुसार कोणते प्रकारची कागदपत्रांची पूर्तता न करता येणे लेआउट नगरपंचायतच्या अभिलेखावर नोंद केल्याप्रकरणी तसेच महसूल विभागाला कोणतीही कल्पना न देता शासनाचे फसवणूक केल्याप्रकरणी वरील नमूद गटाची नगरपंचायतीच्या अभिलेखाचे पाहणी करून दोषीवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी पाशा खतीब यांनी एका निवेदनाद्वारे केली होती.

सदरील गटाची येणे लेआउट तात्काळ रद्द करावी अन्यथा मी लोकशाही मार्गाने 15 ऑगस्ट 2024 रोजी माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांच्या दालना समोर आत्मदहन करेन असा इशारा देत नगरपंचायत हिमायतनगर भूमिफिया तसेच शासनावर याची जबाबदारी राहील असे तक्रारदार पाशा खतीब यांनी निवेदनात नमूद केली आहे.

 

पाशा खतीप 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}